थेरगावात दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

0
590

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – थेरगाव फाट्याजवळ दोघांवर आठ ते दहाच्या जणांच्या टोळक्यांनी कोयता आणि हॉकीस्टीकने प्राणघात हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि.४)  रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

इंद्रजित माने आणि अजय खानेकर असे जखमी दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास इंद्रजित आणि अजय हे दोघे मित्रांसोबत थेरगाव फाट्याजवळ गप्पा मारत बसले होते. तेंव्हा तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहाजणांच्या टोळक्यांनी कोयता आणि हॉकी स्टिकने इंद्रजित आणि अजय या दोघांवर जबरदस्त हल्ला चडवला. यावेळ इंद्रजित याच्या डोक्यात एकाने कोयत्याने वार केला. तेंव्हा इंद्रजितला वाचवण्यासाठी अजयने हात मध्ये घातला. नंतर एकाने इंद्रजितच्या पायावर हॉकी स्टिक हाणून त्याला खाली पाडले आणि त्याच्यावर सपासप वार केले. या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाकड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.