कालिदास कोळंबकरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार   

0
428

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसमधील नेत्यांच्या राजीनामा देऊन भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे वडाळा मतदारसंघाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज(सोमवार) आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिला आहे.

राजीनामा दिल्यानंतर कोळंबकर म्हणाले की, गेल्या साडे चार वर्षात काँग्रेसने माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवले नाहीत, त्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देत  आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझी कामे केली आहेत, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी आहे. नायगावमधील पोलिसांचा प्रश्न सुटला की मी भाजपमध्ये प्रवेश करणार  आहे.

दरम्यान, कोळंबकरांच्या अटी  मुख्यमंत्र्यांनी  मान्य केल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी (दि.३०)  ते आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवणार आहेत. तर बुधवारी (दि.३१)   त्यांचा भाजपमध्ये प्रवेश  होण्याची शक्यता आहे.