अल्पवयीन मुलीच्या होणा-या पतीला पाठवले अश्लील फोटो; तरुणाला अटक

0
249

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – प्रेमाची आणि लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी करत अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग केला. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधून तिच्यासोबत अश्लील फोटो काढले. ते फोटो अल्पवयीन मुलीच्या होणा-या पतीला सोशल मीडियावर पाठवून तिचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
निखिल सुनील ढकोलिया (वय २०, रा. अशोकनगर, लिंकरोड, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या ५० वर्षीय वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल याने फिर्यादी यांच्या पीडित अल्पवयीन मुलीचा प्रेमाची आणि लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी करत सतत पाठलाग केला. पीडित मुलीसोबत मैत्री करून तिच्याशी लगट करून तिच्यासोबत अश्लील फोटो काढले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने अल्पवयीन मुलीला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मुलीसोबत काढलेले अश्लील फोटो तिच्या होणा-या पतीला पाठवून व्हायरल केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.