कांदा महागला म्हणून मोदी कांदे उगवणार आहेत का? – रामदेव बाबा

0
435

अहमदनगर,दि.९ (पीसीबी) – योगगुरु बाबा रामदेव यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेर इथल्या गीता महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी विद्यार्थ्यांना सल्ला देताना रामदेव बाबांनी विविध विषयांवर भाष्य केले. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणतात रोजगार द्या, आमच्या शेतीमालाल योग्य भाव द्या, कांद्याचे भाव कमी करा. मोदी हे काय कांदे उगवणार आहेत का ?, असा सवाल योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांनी संगमनेर येथील गीता महोत्सवामध्ये बोलताना केले.

कांदा टंचाई मुळे कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात सध्याची कांद्याची परिस्थिती पाहता, परदेशातून कांदा आयातीबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्यातच संगमनेर येथे गीता जयंतीनिमित्ताने गीता परिवाराने आयोजित केलेल्या गीता महोत्सवामध्ये योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांनी कांद्याच्या वाढणाऱ्या दरासह बोरोजगारी बाबत भाष्य केले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गीता परिवाराचे संस्थापक स्वामी गोविंददेवगिरीजी यांचीही व्यासपीठावर यावेळी उपस्थिती होती.