‘काँग्रेस की शहजादी’; योगी आदिनाथकडून प्रियंका गांधींचा खोचक उल्लेख

0
495

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी प्रचारात रान उठवले असतानाच मुख्यमंत्री योगी आदिनाथ त्यांच्यावर टीकेची एकही संधी सोडत नाहीत.   

भाजप आणि काँग्रेस मध्ये चांगलेच वाक्‌ युद्ध  रंगल्याचे पाहायला मिळत  आहे.  योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी प्रियंका यांना नवे नाव दिले आहे. योगींनी प्रियंका गांधी यांना ‘काँग्रेस की शहजादी’ म्हणजे ‘काँग्रेसची राजकन्या’ असे खोचकपणे म्हटले आहे. यावर आता काँग्रेस त्यांना काय उत्तर देणार, हे पाहणे मनोरंजनाचे ठरणार आहे.

योगी यांनी आपल्या भाषणात प्रियंका गांधींवर टीका  केली. त्यांनी प्रियंका गांधी यांचा उल्लेख ‘काँग्रेस की शहजादी’ म्हणजेच  ‘काँग्रेसची राजकन्या’ असा केला आहे. विशेष म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा  ‘काँग्रेसचा शहजादा’असा खोचक उल्लेख केला होता.