काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शो दरम्यान स्फोट

0
502

जबलपूर, दि. ७ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मध्यप्रदेश येथील जबलपूर जिल्ह्यातील रोड शो दरम्यान गॅसच्या फुग्यांचा स्फोट झाला. ही घटना शनिवारी (दि.६) घडली. सुदैवाने या ब्लास्टमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. राहुल गांधींसह सर्व जण सुखरुप आहेत.

राहुल गांधी सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी यांनी जबलपूरला ८ कि.मीचा रोड शो केला. रोड शोदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आरतीची तयारी केली होती. येथील शास्त्री ब्रिज परिसरात गॅसने भरलेले फुगेही होते. आरतीचे ताट गॅसच्या फुग्यांच्या संपर्कात आल्यामुळे लहानसा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. काही वेळासाठी सर्वजण स्तब्ध झाले. पोलिसांनी तातडीने याकडे लक्ष देते नियंत्रण मिळवले.