काँग्रेससाठी एमआयएमला सोडणार नाही – प्रकाश आंबेडकर

0
356

मुंबई, दि. ७ (पीसीबी) –  काँग्रेससाठी एमआयएमला सोडणार नाही. एकदा मैत्री केली की केली, असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचा  ज्या १२ जागावर सतत पराभव होत आला आहे. त्या जागा आम्ही लढवतो, असा प्रस्ताव  काँग्रेससमोर ठेवला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना फार किंमत आहे, असे मला दिसलेले नाही. मला कळायला मार्ग नाही, आम्ही कुणाशी बोललो, म्हणजे काँग्रेससोबत युती होईल,  असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबतच्या चर्चेबद्दल म्हटले आहे.

एमआयएमला काँग्रेसचा विरोध आहे, यावर प्रकाश आंबेडकर यांना  विचारले असता, ते म्हणाले की,  काँग्रेसला केरळमध्ये मुस्लिम लीग चालते, मग येथे एमआयएम का नाही चालत? शिवाय, ते पुढे म्हणाले की,  काँग्रेससाठी एमआयएमला सोडणार नाही. एकदा मैत्री केली की केली, असे ते म्हणाले.