बंदुकीचा धाक दाखवून निगडीत सराफी पेढीतील साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने पळवले  

0
452

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – सराफी व्यावसायिकाला व दोन कामगारांना बंदुकीचा धाक दाखवून सराफी पेढीतील साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने भरदिवसा लुटून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारी दोन वाजता पुणे- मुंबई मार्गावरील  निगडीतील सचिन ज्वेलर्स येथे घडली. या प्रकारमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी नितीन सुरेश ओसवाल (वय. ४५ रा. निगडी, प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोंडाला मास्क बांधलेले दोघेजण शुक्रवारी दुपारी दोन वाजता सचिन सराफी पेढीत घुसले. सराफी पेढीचे मालक ओसवाल आणि दोन कामगारांना बंदुकीचा धाक दाखविला. सोन्याच्या ट्रेमध्ये ठेवण्यात आलेले ५ लाख ६५ हजार ३६० रूपयांच्या १७८ ग्रॅमच्या ४ सोनसाखळ्या घेऊन चोरट्यांनी दुचाकीवरून पोबारा केला.

निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश पवार अधिक तपास करत आहेत.