काँग्रेसकडून युवकांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी  

0
418

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत  युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी युथ काँग्रेसने एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन  केले आहे.  याअंतर्गत काँग्रेस युवकांना एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी देणार आहे. ‘मैं भी नायक, सीएम फॉर अ डे’ असे या मोहिमेचे नाव आहे.

एक दिवस मुख्यमंत्र्यांसोबत  घालवता येणार आहे. काँग्रेसची जिथे जिथे सत्ता आहे, त्या राज्यात मुख्यमंत्र्यांसोबत एक दिवस घालवण्याची संधी काँग्रेस युवकांना देणार आहे.  तर ‘वेक अप महाराष्ट्र’ या मोहिमेंतर्गत युथ काँग्रेस तरुणांसाठी जाहीरनामा तयार करत आहे.

या स्पर्धेत तरुणांना त्यांचे स्वप्न, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या सूचना द्यायला सांगण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील दोन विजेते निवडले जातील. त्यांना ‘विधानसभेचे तिकीट’ देऊन मुंबईला पाठवले जाईल. यापैकी पाच जणांची ‘मैं भी नायक, सीएम फॉर अ डे’ साठी निवड होईल. हे युवक वेक अप महाराष्ट्र अभियानाचाही भाग होतील.

याबाबत महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले की,  तरुण आज सोशल मीडियावर स्वत:ची राजकीय, सामाजिक मतं हिरिरीने मांडत असतात. पण त्यांना वास्तव काय आहे, याचे आकलन अनेकदा होत नसते. उदाहरणार्थ, हिंजवडीच्या अनेक युवकांना हे माहित नाही की राजीव गांधी इन्फोटेक पार्क आधीच्या काँग्रेस सरकारचे योगदान आहे. म्हणून आम्ही युवकांपर्यंत पक्षाचे काम घेऊन जाणार आहोत.