कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा

0
435

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम ३७० हटवण्याच्या गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या ठरवला बहुजन समाज पार्टीने पाठिंबा घोषित केला.

राज्यसभेत बसपाचे नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की  आमचा पक्ष सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो व आमची अशी इच्छा आहे की, हे विधेयक लवकरात लवकर मंजूर होऊन याचे कायद्यात रूपांतर व्हावे.