….त्या काँग्रेस आमदारांनी दिला राजीनामा

0
390

कर्नाटक, दि,१ (पीसीबी) – कर्नाटकात राजकीय घडामोडी सुरू आहेत. येथील बल्लारी जिल्ह्यातील विजयनगर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आनंद सिंह यांनी आपला विधानसभा सदस्यत्वाचा राजभवनात जाऊन राजीनामा दिला आहे.

विधानसभा अध्यक्ष के आर रमेश यांच्याकडे आनंद सिंह यांनी राजीनामा सोपवला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंर्तर्गत धुसफुस उघड झाली आहे. एवढेच नाहीतर काँग्रेसचे काही अन्य आमदार देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. आनंद सिंह यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र त्यांना ते न मिळाल्याने देखील ते नाराज होते. मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी हे राज्याबाहेर असताना या सर्व घडामोडी घडत आहेत. ८ जुलै रोजी ते अमेरिकेहून परतणार आहेत. तर, आनंद सिंह हे भाजपा प्रवेशाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे.

कर्नाटकचे मंत्री व काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी आमदार आनंद सिंह यांच्या राजीनाम्याबद्दल सांगितले की, नक्कीच माझ्यासाठी हे धक्कादायक आहे. मी त्यांचा शोध घेत आहे मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. मला विधनासभा अध्यक्षांशी प्रत्यक्ष भेटूनच याबाबत सत्य समजले.