आता १२,९९९ रुपयांत खरेदी करा ४ कॅमेऱ्यांचा हा स्मार्टफोन

0
780

मुंबई, दि,१ (पीसीबी) – Huawei Y9 (2019) च्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. या फोनच्या किंमतीत कंपनीकडून 3 हजार रुपयांची घट करण्यात आली आहे. अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर हा फोन 12 हजार 990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. Huawei Y9 लाँच झाला त्यावेळी 15 हजार 990 रुपये इतकी याची किंमत होती. तीन हजार रुपयांच्या कपातीसह हा फोन केवळ अॅमेझॉनवरुनच खरेदी करता येईल. या फोनच्या मागील बाजूला आणि पुढील बाजूला एकूण चार कॅमेरे आहेत.

मिडनाइट ब्लॅक आणि सफायर ब्ल्यू अशा दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. 3 हजार रुपयांच्या कपातीमुळे 15 हजारांखालील किंमतीच्या सेगमेंटमध्ये हा फोन एक उत्तम पर्याय आहे. किंमतीतील ही कपात कायमस्वरुपी आहे की तात्पुरती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून हा फोन अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर 12 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यातच कंपनीने Huawei Y9 (2019) लाँच केला होता. ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन कंपनीच्या Y9 (2018) स्मार्टफोची पुढील आवृत्ती आहे. अँड्रॉइड 8.1 ओरिओ आधारित EMUI 8.2 वर हा स्मार्टफोन कार्यरत असेल. यामध्ये 4GB रॅम आणि ऑक्टा-कोर Kirin 710 प्रोसेसरआहे. तसंच यात 6.5-इंच फुल-HD+ (1080×2340 पिक्सल) डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आहे. तसंच सेल्फीसाठी देखील 16 आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. इंटर्नल मेमरी 64GB असून मेमरी कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. यात 4,000mAh क्षमतेची बॅटरी असून मागील बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे.