कर्णधारपदासाठी उपलब्ध अनेक पर्याय

0
192

मेलबर्न, दि.२३ (पीसीबी) : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा स्टिव्ह स्मिथकडे येऊ शकते याबाबत सध्या जोरात चर्चा आहे. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या स्पष्टिकरणाने या चर्चेरा पूर्णविराम मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासाठी स्मिथकडे पुन्हा वळण्याचा एकमेव पर्याय नसून आमच्यासमोर यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. काही युवा खेळाडू आमच्या नजरेसमोर आहेत, की जे संघाला चांगले नेतृत्व देऊ शकतात, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

चेंडू कुरतडण्याप्रकरणी स्मिथला कर्णधारपदावरीन हटविल्यावर यष्टिरक्षक टिम पेनची कर्णधारपदी वर्णी लागली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली देखील ऑस्ट्रेलियाची घोडदौड सुरू आहे. मात्र, चेंडू कुरतडल्या प्रकरणी बंदी उठल्यावर पुन्हा कर्णधारपदासाठी स्मिथचे नाव चर्चेत येऊ लागले. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच ही चर्चा थांबविण्याचे प्रयत्न केले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्याध्यक्ष इर्ल एडिंग्ज यांनी ईएसपीएन या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीच्या सुरवातीलाच आमच्याकडे मेग, अॅरन आणि टिम असे तीन युवा कर्णधार आहेत. या खेरीज अन्य काही युवा खेळाडू कर्णधार म्हणून आपली योग्यता सिद्ध करत आहेत. त्यामुळे कर्णधारपदासाठी केवळ स्मिथच आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट केले.

स्मिथ नक्कीच चांगला कर्णधार होता. पण, जेव्हा जेव्हा कर्णधार बदलाचा प्रश्न आला, तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चर्चा करूनच निर्णय घेतला आहे. आम्ही अनेक खेळाडूंना उपकर्णधार केले. त्यानंतर आम्ही निवड समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेतले. या वेळी देखिल पेनचा उत्तराधिकारी शोधताना आम्ही निवड समिताचा विचार नक्कीच घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया सध्या तरी आपल्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा शोध घेण्यात व्यग्र आहे. जेम्स सदरलॅंड यांच्यानंतर ही जबाबदारी केविन रॉबर्टस यांच्याकडे होती. मात्र, करोनाच्या संकटकाळातच जून महिन्यात त्यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला. लॉक डाऊनच्या कालावधीत एप्रिल महिन्यात त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये ७० टक्के कपातीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांना बहुतेक जणांचा रोष पत्करावा लागला होता. रॉबर्टस यांच्या राजीनाम्यानंतर निक हॉकली यांची हंगामी मख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियक्ती करण्यात आली होती. आता त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.