करिअर’च्या जुन्या वाटा बदला; महापालिका आयुक्तांचा विद्यार्थ्यांना सल्ला

0
462

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – करिअर च्या जुन्या वाटा बदला कारण जगात इंजिनिअर , डॉक्टर यांच्यापेक्षा नवीन क्षेत्राला मागणी वाढत आहे, असा सल्ला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. शुक्रवारी (दि. ५)  LUMAX कंपनी आणि FUEL NGO यांच्या संयुक्त विद्यमाने  इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी  “लुमॅक्स करिअर एज्यूकेशन कार्यक्रमाचा शुभारंभ पिंपळेसौदागर येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पार पडला. यावेळी शालेय विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर , नगरसेवक शत्रुघ्न काटे, FUEL या NGO चे चेअरमन केतन देशपांडे, CSR च्या प्रमुख प्रियांका शर्मा, LUMAX चे राजेश डुब्बेवर, FUEL NGO च्या मयुरी देशपांडे, मुख्याध्यापिका सुनीता इसकांडे, LUMAX ची सर्व टीम तसेच शाळेतील सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी आपल्या भाषणांमध्ये विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला व म्हणाले “करिअर च्या जुन्या वाटा बदला कारण जगात इंजिनिअर , डॉक्टर यांच्यापेक्षा नवीन क्षेत्राला मागणी वाढत आहे . करियरची वाटा शोधतांना स्वतःला काय व कश्यात करिअर करायचे आहे याचा प्रथम विचार करा . कोणत्याही मानसिक दबावाला बळी पडू नका. आयुष्यात जे काही बनाल ते “बेस्ट” च बना . कोणतेही कार्य करतांना उत्तमतेचा ध्यास धरा. आयुष्यात ध्येय ठरवतांना सर्वात उच्चप्रकारचे ध्येय निवडा. सर्व सामान्य ध्येय ठरवून पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षणाचा ध्यास घ्या. स्वतःला . समाजाला व आपल्या देशाला उच्च शिखरावर न्या”, असे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनीही विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला व व म्हणाले कि ” स्वतःचे  करिअर निवडतांना स्वतःची बुद्धी, क्षमता, आवड व काळाची गरज याचा विचार नक्की करावा जेणेकरून आपला भविष्य सुर्यासारखा तेजस्वी राहील”, त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशपांडे एम. यांनी केले तर चव्हाण के. ए. यांनी आभार मानले.