कबुतर आणि कोंबड्या चोरल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण; तिघांना अटक

0
215

देहूरोड,दि.१२(पीसीबी) – कबुतर आणि कोंबड्या चोरल्याच्या संशयावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 11) सकाळी साडेदहा वाजता भैरवनाथ मंदिरासमोर, चिंचोली देहूरोड येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

राहुल संजय टाक (वय 20), अरविंद अजितकुमार राजकुमार कलीमूर्ती (वय 19), कुमार राजकुमार कलीमूर्ती (वय 22, तिघे रा. एम बी कॅम्प, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्यासह रोहित स्वामी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुसेन चांद शेख (वय 23, रा. भैरवनाथ मंदिरासमोर, चिंचोली, देहूरोड) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांनी आरोपींच्या कबुतर आणि कोंबड्या चोरल्याचा संशय आरोपींना होता. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना बांबू आणि स्टंपने मारहाण करत परिसरात दहशत माजवली. मारहाण केल्यानंतर आरोपी पळून गेले. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.