कंपनीच्या मोकळ्या शेडमधून 50 हजारांची कॉपर केबल चोरीला

0
243

भोसरी, दि. ६ (पसीबी) – एमआयडीसी भोसरी येथील इनोव्हेटिव्ह सोल्युशन इंडिया प्रा ली या कंपनीच्या मोकळ्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी 50 हजारांची कॉपर केबल चोरून नेली. ही घटना 1 सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून याबाबत 5 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती जितेंद्र चौधरी (वय 37, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या इनोव्हेटिव्ह सोल्युशन इंडिया प्रा ली या कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी फिनोलेक्स पॉलीकॅब आर आर लॅप कंपनीच्या 50 हजारांच्या कॉपर केबल वायर चोरून नेल्या. हा प्रकार 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते 1 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.