औरंगजेबाविरोधात राजाशिवाय रयत १८ वर्षे लढत राहिली हा इतिहास आहे – अमोल कोल्हे

0
792

सातारा, दि. २९ (पीसीबी) – अलोट आणि अभुतपूर्व रेकॉर्डब्रेक गर्दीने झालेले शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत हे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याची प्रचिती देते. एखादा दुसरा बुरुज ढासाळाला म्हणून किल्ला पडत नसतो छातीचा कोट करून लढणारा मावळा माग हटत नसतो. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पक्षांतरण करणाऱ्या नेत्यांवर तोफ डागली. बुधवारी कल्याण रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या सभेत अमोल कोल्हे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवेंद्रराजे, उदयनराजे रामराजे यांच्यावर तोफ डागली.

यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, जे पक्ष सोडून गेले त्यांच्यावर मी टीका करणार नाही. मात्र, त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. आजपर्यंत आम्ही आदराने तुमच्यापुढे झुकत होतो. तुम्ही ज्यांच्यावर अनेक आरोप करत होतात आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसला आहात. कोणकोण कशासाठी जातंय हे सर्वश्रुत आहे.

या सरकारच्या काळात १६ हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आहे आणि पुढेही राहील. बुरूजाचा एखादा दगड ढासळला म्हणजे संपूर्ण किल्ला ढासळला असे होत नाही. औरंगजेबाविरोधात राजाशिवाय रयत १८ वर्षे लढत राहिली हा इतिहास आहे, अशा शब्दात त्यांनी सातारा जिल्ह्यातील तिन्हीही राजांना इशारा दिला. जे छत्रपतींचे नाव वापरतात त्यांना या गर्दीने धडकी भरली आहे, असेही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.