‘ओबीसी समाजाचा विसर पडला, प्रीतम मुंडेना मंत्रिमंडळात स्थान नाही?’

0
280

मुंबई, दि.०७ (पीसीबी) : प्रकाश शेंडगे यांनी ‘केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला अखेर ओबीसी चेहऱ्याचा विसर पडल्याची’ टीका केली. गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता. तो मात्र या मंत्रिमंडळात नाही आहे, याकडे प्रकाश शेंडगे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अगदी कालपर्यंत प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, आज सकाळपासून अचानक भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे खासदार प्रीतम मुंडे यांचे कॅबिनेट मंत्रीपद हुकल्याची चर्चा सुरु आहे.

भाजपने मराठा आणि ओबीस चा राजकारणातला चेहरा महाराष्ट्रातला देण्याचा प्रयत्न केलाय. तर महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा आरक्षण च राजकारण सुरू आहे. त्यामुळे नारायण राणे मराठा समाजाचे नेते आणि कपिल पाटील आगरी समाजाचे तसंच वंजारी समाजाचे भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याची चर्चा आहे. ओबीसी आणि मराठा कार्डचा फायदा भाजपला पुढील राजकारणात व्हावा हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न आहे.

मोदी मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. या दोन्ही खासदारांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेतल्याचं सांगितलं जात आहे. रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते जालन्यातील भोकरदन तालुक्यातील खासदार आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रीपदाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

संजय धोत्रे हे अकोल्याती खासदार आहेत. त्यांच्याकडे सध्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातील राज्यमंत्रीपद आहे. त्यांच्याही कामगिरीवर मोदी समाधानी नसल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याचं सांगितलं जात आहे. मोदींनी नुकतेच मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड मागवले होते. पण काही मंत्र्यांनी रिपोर्ट कार्ड दिलं नव्हतं. त्यामुळे मोदींनी हा मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे धोत्रेंच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.