मारुंजी येथे मराठी पत्रकार दिनी चिलेकर, चांदेरे, तापकीर, लकडे यांचा गौरव..

0
381

हिंजवडी, दि. ७ (पीसीबी) :-मारुंजी येथील जाणता राजा प्रतिष्ठान व पत्रकार संघ मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ‘स्मार्ट किड्स पब्लिक सकूल’ येथे मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुळशी तालुक्यातील मान्यवरांची उपस्थती होती. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेले अविनाश चिलेकर, आरोग्य अधिकारी बालाजी लकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक सुनील चांदेरे व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे संचालक सुखदेव तापकीर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि पीसीबी टुडे चे संपादक अविनाश चिलेकर म्हणाले, बदलत्या काळात पत्रकार आणि पत्रकारिता देखील बदलत आहे. आता सोशल मीडिया आणि इतर साधने वाढली आहेत. त्यामुळे घरोघरी पत्रकार तयार झाले आहेत. त्यामुळे विश्लेषणात्मक पत्रकारितेवर भविष्यात भर दिला गेला पाहिजे. यास भविष्यात मोठा वाव असणार आहे. मुळशी पॅटर्न बदलुन आता नव्याने या परिसरात प्रामुख्याने मुळशी-मावळ परिसरात कृषी, पर्यटन, हॉटेल सारख्या व्यवसायांवर अधिक लक्ष युवकांनी द्यावे यातून उद्योग उभरावेत.
पत्रकारांमुळे चढता आलेख-चांदेरे
आपल्या भाषणात चांदेरे यांनी पत्रकारितेचे महत्व, पत्रकारांचे सामाजिक चळवळीतील योगदाना यावर अत्यंत मार्मिक शब्दांत भाष्य केले. ते म्हणाले, विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय होतो. मात्र पक्षाचा तालुकाध्यक्षपदी काम करत असताना पत्रकारांची साथ मोलाची लाभली. वेळोवेळी पत्रकारांची साथ व मार्गदर्शन लाभल्याने काम करण्यासाठी उत्साह मिळाला. याच अनुभवाचा लाभ भविष्यात सहकार क्षेत्रात होईल. तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात येतील.

पत्रकारांचा समाजातील सर्वच घटकांना होतो लाभ-बांदल
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्व लोकांना पत्रकारांचा लाभ होत असतो. बाळशास्त्री जांभेकर यांनी राज्यात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. त्या माध्यमातून आज ग्रामीण भागात पत्रकारिता वाढत आहे. विविध माध्यमातून आज पत्रकार व्यक्त होत आहेत.
कष्टकरी कामगारांना राजकारणात पत मिळाली-मातेरे
रामभाऊ गायकवाड आणि मी एका औद्योगिक संस्थेत काम करत होतो. मात्र राजकारणाची आवड आणि त्या-त्या पक्षाची विचारधारा वेळोवेळी पत्रकार मंडळींनी मांडली त्यामुळे आमच्या सारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळाला.

पत्रकारांनी व्याख्या बदलावी-कोंढरे
मुळशी तालुक्याची ‘मुळशी पॅटर्न’ ही असलेली व्याख्या आता पत्रकारांनी त्यांच्या माध्यमातून बदलावी. येथील नैसर्गिक साधने, पर्यटन, व्यवसाय, पूरक व्यवसाय याचा पुरस्कार करावा. यातून नवीन पिढी घडवावी. मुळशीत पत्रकार, पोलीस व राजकीय पदाधिकारी यांचं योग्य समन्वय असल्याने अनेक समस्या मार्गी लागत आहेत. यावेळी मुळशी पंचायत समितीचे सभापती पांडाभाऊ ओझरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक मोहन यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, युवा नेते सुरेश हुलावळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष बाबाजी शेळके, पेरिवींकल इंग्लिश मिडीयम स्कुलचे अध्यक्ष राजेंद्र बांदल, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सचिन खैरे, अतिरिक्त गटविकास अधिकारी संजय ढमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, रामभाऊ गायकवाड, माजी उपसभापती भानुदास पानसरे, मारुंजीचे माजी उपसरपंच गणपत जगताप, पिंपळोली गावचे माजी सरपंच अविनाश खानेकर, माण ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा माजी उपसरपंच संदीप साठे, जीवन साखरे, मूलखेडचे माजी सरपंच बाळासाहेब तापकीर, युवा नेते कपिल बुचडे, नेरे गावचे सरपंच सचिन जाधव, पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, माजी सरपंच योगेश शिंदे, दत्तात्रय बुचडे, जांबे गावाचे माजी सरपंच अंकुश गायकवाड, विद्यमान उपसरपंच अंकुश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यध्यक्ष बाबासाहेब बुचडे, ग्रामविकास अधिकारी सोमा खैरे यावेळी उपस्थित होते.
यावेळी माजी अध्यक्ष राजेंद्र मारणे, अपेक्षा मासिकाचे संपादक दत्तात्रय उभे, पत्रकार संघाचे कार्यध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष सागर शितोळे, दैनिक प्रभातचे पत्रकार सचिन केदारी, दैनिक सकाळचे बातमीदार बेलाजी पात्रे, राजेंद्र कापसे, दत्तात्रय जोरकर, मारुती बाणेवार उपस्थित होते. यासह लेखक बबन मिंडे, क्रीडा लेखक संजय दुधाने यांना सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन महेंद्र बुचडे, प्रदीप बुचडे, अमरदास भिंताडे, सोहम चव्हाण, अक्षय बुचडे, पंकज जगताप, यश बुचडे यांनी तर आयोजन पत्रकार संघ मुळशी व जाणता राजा युवा प्रतिष्ठाणचे समीर बुचडे यांनी केले. सूत्रसंचालन दवने मॅडम यांनी तर आभार प्रदीप पाटील यांनी मानले.