ऑलिंपिक पात्र तिरंदाजांनी घेतला लशीचा दुसरा डोस

0
318

पुणे, दि.०८ (पीसीबी) – ऑलिंपिकसाठी पात्र असलेले भारतीय तिरंदाजांनी आज कोविड १९ लशीचा दुसरा डोस घेतला. लशीचे दोन्ही डोस घेणारे तिरंदाज हे भारतातील पहिले खेळाडू ठरले आहेत.

भारतीय तिरंदाज सध्या येथील लष्करी क्रीडा केंद्रात सराव करत असून, त्यांच्याच पुढाकाराने रिकर्व्ह प्रकारातील तिरंदाजांना लशीचे दोन्ही डोस यशस्वीरित्या देण्यात आले. आठ तिरंदाज, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ या सर्वांना येथील लष्करी रुग्णालयात दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये अतानु दास, तरुणदीप राय, प्रविण जाधव, बी. धीरज (राखीव), दिपीका कुमारी, कोमलिका बारी, मधु वेदवान (राखीव) या खेळाडूंचा समावेश होता.
लस घेतानाचे अतानुने पोस्ट केलेले छायाचित्र

लष्करी क्रीडा केंद्राच्या वतीने सर्व प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली. त्यांच्यामुळे आम्ही दोन्ही डोस घेऊ शकलो. त्यांना धन्यवाद अशा ओळींसह अतानु दास याने लस घेतानाच आपला फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. अतानुची पत्नी आणि अव्वल तिरंदाज दिपीका कुमारी तसेच संघ सहकारी तरुणदीर राय यांनीही आपले फोटो ट्विट केले आहेत.

करोनाच्या संकटकाळानंतर प्रथमच तिरंदाजीची स्पर्धा होणार आहे. या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय तिरंदाज सहभागी होणार असून, या स्पर्धेसाठी भारतीय तिंरदाज भारतीय तिदाज १९ एप्रिलपासून होणाऱ्या या विश्वकरंडक स्पर्धेसाटू सज्ज झाले आहेत. ऑलिंपिक पूर्वी तीन विश्वकरंडक होणार असून, तिसरी स्पर्धा ही ऑलिंपिकसाठी पात्रता फेरी असेल.

भारताने आतापर्यंत ऑलिंपिकसाठी पुरुष सांघिक आणि महिला वैयक्तिक असे दोनच कोटा मिळविले आहेत. भारतीय महिलांना ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यासाठी विश्वकरंडक मालिकेतील तिसरी फेरी ही अखेरची संधी असेल. ही स्पर्धा २१ ते २७ जुलै दरम्यान पॅरिस येथे होणार आहे.

लष्कराच्या माध्यमातून ऑलिंपिक पात्रतेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारताच्या ३५ प्रमुख रोईंग खेळाडूंचेही लशीकरण करण्यात आले आहे.