एफडी मोडून आम्हाला पैसे दे, तु आम्हाला पसंत नाही; असे म्हणत केला विवाहितेचा छळ

0
278

हिंजवडी, दि. ५ (पीसीबी) – सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 जून 2020 ते 26 मे 2021 या कालावधीत घडला. मंगेश बबन शिवेकर (वय 28), कुंदा बबन शिवेकर (वय 48), बबन भागोजी शिवेकर (वय 55), योगेश बबन शिवेकर (वय 26), संतोष तुकाराम चोपडे (वय 40, सर्व रा. अंधेरी पश्चिम सब अर्बन मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपसात संगणमत करून फिर्यादी यांच्याकडे ‘एफडी मोडून आम्हाला पैसे दे. तु आम्हाला पसंत नाही’, असे म्हणत सतत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पतीने फिर्यादीच्या अकाउंटवरून फिर्यादीचा विश्वास संपादन करून चार लाख रुपये काढून घेतले. तसेच लग्नात फिर्यादी यांच्या वडिलांनी दिलेले दागिने काढून घेतले. फिर्यादी यांच्या वडिलांना बघून घेण्याची धमकी दिली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.