एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन काळेवाडीतील वृध्दाला ३५ हजारांचा गंडा

0
511

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – एटीम कार्डचे क्लोलिंग करुन एका ६२ वर्षीय वृध्दाच्या बँक खात्यातून तिघांनी तब्बल ३५ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. ही घटना शनिवार (दि.५) ते रविवार (दि.६) दरम्यान घडली.  

दिलीप दिगंबर गायकवाड (वय ६२, रा. रिदम हौसिंग सोसायटी, बी-२, प्लॅट नं.६०२, काळेवाडी फाटा, वाकड) असे फसवणूक झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात दोन पुरुष आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ते रविवार दरम्यान अज्ञात दोन पुरुष आणि एका महिलेने फिर्यादी दिलीप गायकवाड या वृध्दाच्या बँक खात्यातील एटीम कार्डचे क्लोलिंग करुन बँक खात्यातून एकूण ३५ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात दोन पुरुष आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.