एकाने जाहीर सभेत लहान भाऊ म्हटलं, तर दुसऱ्याने मोठा भाऊ बनवलं – उद्धव ठाकरे

0
574

मुंबई,दि.३(पीसीबी) – सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली, यावेळी “एकाने जाहीर सभेत लहान भाऊ म्हटलं, तर दुसऱ्याने मोठा भाऊ बनवलं. मात्र, मी या दोन भावांच्या कात्रीत सापडल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

आपल्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला छोटा भाऊ म्हटलं, तर देवेंद्र फडणवीस तुमचा उल्लेख माझे मोठे भाऊ असाच करत होते. मग काय झालं असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “मी दोन भावांमध्ये मी कात्रीत पकडलो गेलो होतो. शिवसेना ही महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या न्यायहक्कासाठी, मराठी माणसासाठी जन्माला आली. त्यानंतर शिवसेना प्रमुखांना जेव्हा लक्षात आलं की देशात हिंदूंवर गंडांतर येतं आहे तेव्हा शिवसेना प्रमुखांनी हिंदूत्वाचा अंगिकार केला. त्यानंतर शिवसेना आणि भाजपसोबत आले.”

दरम्यान, “हिंदुत्वावर एकत्र आलो होतो आणि आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि ते पाळणं याला अत्यंत महत्व आहे. ते जर मोडलं जात असेल, तर ते हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.