ऋषी कपूर यांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले – छगन भुजबळ

0
339

मुंबई,दि.३०(पीसीबी) – ऋषी कपूर यांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले, अशा आशयाचे ट्विट करत मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 68 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतल्या एच. एन. रूग्णालयात काल त्यांना प्रकती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचं आज उपचारादरम्यान निधन झालं आहे. छगन भुजबळ यांनी ट्विट केलं आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीला हे दु:ख पचवणं मोठं कठीण झालं आहे. काल अभिनेता इरफान खान यांच्या दुःखद निधनानंतर आज भारतीय चित्रपट सृष्टीवर पुन्हा ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या दुःखद निधनामुळे शोककळा पसरली असून चित्रपट सृष्टीला हा मोठा धक्का असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रसिकांचीमने जिंकली. चित्रपट सृष्टीत कपूर घराण्याचे मोठे योगदान असून ऋषी कपूर यांच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. दिवंगत हरहुन्नरी कलाकार ऋषी कपूर यांना भावपुर्ण श्रद्धांजली!, असं ट्विट भुजबळ यांनी केलं आहे.