उदयनराजें विरोधात आघाडीचा उमेदवार ठरला,

0
621

सातारा, दि.२६ (पीसीबी) – उदयनराजे भोसले यांनी खासदार पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. उदयनराजे यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरु आहे. नुकतच चव्हाण यांनी दिल्लीवारी केल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.

उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर साताऱ्याची धुरा स्वतः शरद पवार यांनी घेतल्याचे दिसत आहे. पवार यांनी मागील आठवड्यात कार्यकर्त्यांचा जंगी मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनीच सातारा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची मागणी केली होती. तर पवार साताऱ्यातून लढणार असतील तर आपण माघार घेवू, असे उदयनराजे यांनी सांगितले. यावेळी ते भावूक झाल्याचे पहायला मिळाले.

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यात उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये दाखल होताच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. दुसरीकडे त्यांचा भाजप प्रवेश पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे उदयनराजे यांना चीतपट करण्यासाठी आघाडीकडून पृथ्वीराज चव्हाण हे योग्य पर्याय असल्याचे मत आहे.