उत्तराखंडमध्ये भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना पराभवाचा धक्का

0
224

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – आज देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. यात ५ पैकी उत्तराखंड , उत्तरप्रदेश, गोवा आणि मणिपूर या ४ राज्यांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठा विजय संपादन केला आहे. यात भाजपला दुखःदायक बातमी आहे केवळ उत्तराखंडमधून.

उत्तराखंडमध्ये भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पुष्करसिंग धामी यांना ३३,११५ म्हणजे ४३.७५ टक्के इतके मतदान झाले आहे. तर त्यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवार भूवन चंद्र कापरी यांना ४० हजार १०७ मत मिळाली आहे.