आळंदीत शिवजयंती ऊत्साहात साजरी

0
667

आळंदी,दि.२१(पीसीबी) – १९ फेब्रुवारी रोजी मातोश्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांची जयंती आळंदी पोलीस स्टेशनचे अजय लोहकर यांच्या ऊपस्थितीत ऊत्साहात साजरी करण्यात आली. संध्याकाळी ज्ञानेश्वरी जाधव यांचा पोवाड्याचा कार्यक्रम घेऊन त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी चर्होली खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य अर्चना थोरवे व रवी थोरवे तसेच संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवडचे महानगराध्यक्ष सुधीर पुंडे पाटील, प्रविण बोराडे तसेच मनसेचे अध्यक्ष अजय तापकीर , मनसे विभाग अध्यक्ष मंगेश कुबडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वामी नाथ अणि प्रास्ताविक गणेश जाधव अणि त्रंबक मोरे यांनी केलं. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मातोश्री बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान माने यांनी भूषवले. यावेळी गणेश पायघण, संदीप खराते, सतीश राठोड, राम मस्कले, भगत , अविनाशखताळ तसेच लक्ष्मी नगर मधले शिवभक्त उपस्थित होते.