आर्यन खान पोलिसांच्या ताब्यात; अक्ख बॉलिवूड ‘किंग खान’च्या बाजूने पुढे सरसावले. ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री…

0
416

मुंबई, दि.०४ (पीसीबी) : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने रविवारी मुंबई हायप्रोफाईल ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक केली. अटक केल्यानंतर आर्यनला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला एक दिवसासाठी एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर काही बॉलिवूड सेलेब्सनी गप्प बसणे पसंत केले आहे, तर काही किंग खानच्या समर्थनासाठी जाहीरपणे समोर येताना दिसत आहेत.

आर्यनच्या अटकेनंतरच अभिनेता सुनील शेट्टीची प्रतिक्रिया आली होती. यानंतर रात्री उशिरा सलमान खानही शाहरुख खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला होता. आता शाहरुख खानचे दोन सहकारी कलाकार आर्यनच्या बाजूने पुढे आले आहेत.

होय, बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींनी शाहरुखला सोशल मीडियाद्वारे पाठिंबा दिला आहे. आर्यन खानच्या अटकेच्या प्रकरणात पूजा भट्ट आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी ट्विट केले आहे, जे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

शाहरुख खानसोबत ‘चाहत’ चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री पूजा भट्टनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्यनला पाठिंबा दिला आहे. तिने लिहिले, ‘शाहरुख मी तुझ्या पाठीशी उभी आहे. तुम्हाला त्याची गरज आहे असे नाही, पण मी ते करत आहे, ही वेळ सुद्धा निघून जाईल.’

‘कभी हा कभी ना’ चित्रपटात शाहरुखच्या सहभिनेत्रीच्या भूमिकेत दिसलेल्या सुचित्रा म्हणाल्या की, ‘पालकांसाठी त्यांच्या मुलाला अडचणीत पाहण्यापेक्षा काहीही कठीण नाही. सर्वांसाठी प्रार्थना.’

त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘बॉलिवूडला लक्ष्य करणाऱ्यांसाठी, चित्रपट कलाकारांवर NCB चे सर्व छापे आठवतात का? होय काहीही सापडले नाही आणि काहीही सिद्ध झाले नाही, हे एक प्रहसन आहे. केवळ प्रसिद्धीची किंमत.’

दरम्यान, या प्रकरणावर अभिनेता सुनील शेट्टी याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला की, ‘मी सांगू इच्छितो की जिथे जिथे छापे पडतात तिथे बरेच लोक पकडले जातात आणि आम्ही असे गृहीत धरतो की या मुलाने ड्रग्जचे सेवन केले असावे किंवा या मुलाने तसे केले असावे. परंतु कार्यवाही अजूनही सुरू आहे. त्या मुलाला श्वास घेण्याची संधी द्या. नेहमी बॉलिवूडमध्ये किंवा या इंटस्ट्रीत काही घडते, तेव्हा माध्यमे प्रत्येक गोष्टीवर तुटून पडतात. त्या मुलाला थोडा वेळ द्या. सत्य बाहेर येऊ द्या. मुलांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.’