आर्थिक संकटात सापडलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना महापालिकेकडून ‘हा’ मोठा दिलासा; जाणून घ्या नक्की कोणता…

0
884

पिंपरी, दि.०४(पीसीबी) : चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाखांवर पोहोचली असून 2007-08 मध्ये शहरात 2 लाख 54 हजार 247 मालमत्ता होत्या. सध्या 5 लाख 30 हजार मालमत्ता आहेत. यावरून शहराची वाढ लक्षात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेला लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना दिलासा देणारा निर्णय पालिकेने घेतला आहे. महापालिका सभेत शहरातील निवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्व मालमत्तांवर आकारण्यात येणारा सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ करण्यास मंजुरी देण्यात आली.

शहरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. कारण, पिंपरी – चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरालगतच हिंजवडी आयटी पार्क, तळवडे आयटी पार्क, चाकण, रांजणगाव एमआयडीसी हा भाग येतो. या भागात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. संपूर्ण देशभरातून या भागात कामगार वर्ग रोजगारानिमित्त वास्तव्यास आहे. या भागात अंतर्गत रस्ते, पाणी, वीज अशा मुलभुत सुविधा या अपु-याच आहेत. त्यामुळे येथील कामगार वर्ग पिंपरी – चिंचवड शहरात वास्तव्यास प्राधान्य देतो. याचाच परिणाम आयटी पार्क आणि एमआयडीसी लगतच्या पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना साथीमुळे शहरातील लहान-मोठे सर्वच उद्योग लॉकडाऊन कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी महापालिकेने विविध उपाययोजना उपलब्ध करून दिल्या आहेत.

आर्थिक फटका बसल्याने शहरातील अनेक संस्था, संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाकडे मालमत्ता करात सवलत देण्याबाबत मागणी केली होती. त्या अनुषंगाने शहरवासीयांना महापालिकेमार्फत दिलासा देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका सभेत शहरातील निवासी, व्यावसायिक, औद्योगिक अशा सर्व मालमत्तांवर आकारण्यात येणारा सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ करण्यास उपसुचनेद्वारे मंजुरी देण्यात आली.

पिंपरी–चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २४ लाखांचा पल्ला गाठून पुढे गेली आहे. सन 2007-08 मध्ये शहरात अडीच लाखाच्या आसपास मालमत्ता होत्या. सध्या सडे पाच लाखाच्या आसपास मालमत्ता आहेत. यावरून शहराची झालेली वाढ दिसून येते.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच उद्योगधंदे कोरोना काळात बंद राहिल्याने त्याचा लघुउद्योजकांसह कामगार, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक अशा सर्वच घटकांना जबर आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे या वर्गाला महापालिकेचा मालमत्ताकर भरणे अतिशय कठीण जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वापरनिहाय मालमत्ता
मोकळ्या जमीन – 8838
औद्योगिक – 3702
मिश्र – 15,848
बिगरनिवासी – 47,009
निवासी – 4, 50,168
इतर – 5,222
————————
एकूण- 5,30,787