आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग २१ पिंपरीगाव मध्ये मोफत आरोग्य शिबीर

0
191

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) -आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग २१ पिंपरीगाव मध्ये भाजपा ओबीसी मोर्चा शहर सरचिटणीस नेहुल कुदळे आणि उपाध्यक्ष कमल मलकानी यांच्या पुढाकाराने आणि लायन्स क्लब ऑफ पिंपरी, सिंधू सेवा संघम, दृष्टी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या आरोग्य शिबीरमध्ये पिंपरी परिसरातील ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला. आरोग्य शिबीर मध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हृदय तपासणी, डायबेटिस तपासणी, त्वचारोग तपासणी, रक्तदाब, ईसीजी करण्यात आले.

आरोग्य शिबिराचे उद्घाटन लायन्स रिजन चेअरपर्सन सुदाम मोरे, झोन चेअरपर्सन समिक्षा मंधान आणि यांनी केले.
डाॅ. राज पंजवानी, डाॅ भुपेंन्द्र पवार आणि सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. आरोग्य शिबीरमध्ये हरेश मंधान, सुशील बजाज, सुरेंद्र मंगवानी, भारती कुदळे, मोनिका मंधान, गणेश वाळूंजकर, शैलेंद्र तुलसानी, संजय गायचरी, अजीत कंजवाणी, श्रीचंद संग्दील, नारायण नारंग आदी उपस्थित पदाधिकारी होते.