आमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व;विलिनीकरणाच्या चर्चांना शरद पवारांचे उत्तर

0
284

मुंबई, दि. १० (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विलिनीकरणाचे विधान  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोडून काढले आहे. मी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष असून पक्षाच्या निर्णयाची अधिक माहिती मला आहे. आमच्या पक्षाचे स्वतंत्र आस्तित्व आहे, असे स्पष्ट करून पवार यांनी विलिनीकरणाच्या चर्चावर पडदा टाकला.

यवतमाळमध्ये आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आम्ही शिंदे साहेबांपेक्षा राष्ट्रवादी जास्त जाणतो.  त्यामुळे विलिनीकरणाबाबतचे त्यांचे विधान वैयक्तिक असू शकते, असे पवार म्हणाले .

सरकार सत्तेचा गैरवापर करून राजकीय व्यक्तींची मुस्कटदाबी केली जात आहे. विरोधकांना नाउमेद करण्यासाठी सरकार सीबीआय, आयबीची भीती दाखवली जात आहे, असा आरोपही  पवार यांनी यावेळी केला.   ज्याच्याशी माझा संबंध नाही, त्या विषयात माझ्यावर गुन्हा दाखल करून  माझे नाव गोवले गेले.  मग फरार दाखवण्यापेक्षा मीच येतो असे सांगितले. या राज्यात निर्दोष माणसाला गुन्हे दाखल करून अटक केली जात आहे, असेही ते म्हणाले.