आमचे काम लक्ष्य भेदणे, मृतदेह मोजण्याचे नाही – हवाई दल प्रमुख

0
612

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) हवाई दलाचे काम लक्ष्य भेदणे हे असते. तिथे किती नुकसान झाले किंवा किती मृतदेह होते, हे मोजणे नाही, अशा शब्दांत  एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. 

आम्हाला जे काही टार्गेट मिळते. आम्ही केवळ तेच उद्ध्वस्त करतो. मृतांचा आकडा नेमका किती आहे, याची माहिती सरकारच देऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एअर स्ट्राईकनंतर हवाई दलाचे प्रमुख बी एस धनोआ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.  बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकवर पाकिस्तान आणि काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर धनोआ यांनी उत्तर दिले आहे.

हवाई दलाच्या विमानांनी  योग्य लक्ष्य  भेदले नाहीत आणि केवळ जंगलातच बॉम्ब पाडले, तर पाकिस्तानने उत्तर का दिले?, असा सवाल  धनोआ यांनी केला. हवाई दलाने यशस्वीरित्या लक्ष्याला भेदले, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या एफ १६ विमानांना उद्ध्वस्त करण्यासाठी  मिग २१ बायसेनचा वापर का केला ? याचीही कारणे धनोआ यांनी यावेळी सांगितले.