महाशिवरात्रीनिमित्त चिंचवडगावातील धनेश्वर मंदिरात केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आरोग्य शिबिर

0
716

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – महाशिवरात्रीनिमित्त चिंचवडगावातील धनेश्वर मंदिरात  भाविकांसाठी पिंपरी -चिंचवड शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिवंसरा आणि वर्धन खिवंसरा यांच्या वतीने महा आरोग्य शिबिराचे आज (सोमवार) आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक कार्यकर्त्या कविता खिवंसरा,  महाराष्ट्र महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराचा सुमारे अडीच हजार भाविकांनी लाभ घेतला.

या शिबिरात युरिक ऍसिड ,स्किन मॉंइसरींग, हाडाचा ठिसूळपणा, कॅलशियम, अस्थमा, रक्तदाब आदी आजारांबाबत रूग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. यावेळी  रक्तदान शिबिरही घेण्यात आले.

वर्धन खिवंसरा, सौरभ शिंदे, मदन चौधरी, प्रांजळ पाटील, राहुल शेडगे, अशोक शिंगाडे, मुकुंद गुरव, आदी उपस्थित होते. टोर्रेन्ट फार्मा, सन फार्मा, बिर्ला हॉस्पिटल यांचे या शिबिरासाठी सहकार्य लाभले.