आमची छाती फाडली तरी रामच दिसतील; आम्हाला दिखावा करण्याची गरज नाही – चंद्रकांत पाटील

0
401

मुंबई,दि.७(पीसीबी) – आमची छाती फाडली तरी रामच दिसतील; आम्हाला दिखावा करण्याची गरज नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आमची छाती फाडली तरी रामाशी नातं दिसतं, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत जाऊन रामाशी असलेलं नातं दाखवावं लागतं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर त्यांनी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत त्याचं स्वागत करतो. राम हे आमचे पूर्वज आहेत, श्रद्धेचा विषय आहेत. मात्र, आता काँग्रेसलाही प्रभूराम मान्य होत असतील तर आनंदच आहे. मात्र, त्यांना रामावरील श्रद्धा दाखवावी लागते, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

दरम्यान, आमचे प्रभूराम सर्वत्र विलिन आहेत. आम्हाला अयोध्येला जाण्याचा सोहळा करावा लागत नाही. आमच्या आत प्रभूरामच आहेत, असंही ते म्हणाले आहेत.