“मी भाजपला सोडलं आहे हिंदुत्व नाही”

0
477

अयोध्या,दि.७(पीसीबी) – मी भाजपला सोडलं आहे हिंदुत्व नाही, असं वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते आयोध्ये मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप आणि हिंदुत्व वेगळं आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. मी भाजपला सोडलं आहे हिंदुत्व नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे.

महाविकासआघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषेदत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

दरम्यान, शिवसेनेकडून राम मंदिरासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राम मंदिर ट्रस्टंच बँक खाते कालच उघडलं आहे. त्यात शिवसेनेकडून १ कोटी रुपयांचा निधी राम मंदिर बांधण्यासाठी दिला जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.