येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक

0
304
मुंबई, दि.८ (पीसीबी) – आर्थिक संकटात आलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) शनिवारी रात्री अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कपूर यांची तब्बल ३० तास चौकशी केली. त्यानंतर मनी लाँडरिंग (आर्थिक गैरव्यवहार) केल्याच्या आरोपात त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
येस बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर ईडीनं शुक्रवारी रात्री बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाईनंतर राणा कपूर यांना चौकशी ईडीन ताब्यात घेतले. शनिवारी दिवसभर यंत्रणांनी त्यांची चौकशी केली. या चौकशीनंतर शनिवारी मध्यरात्री कपूर यांना अटक करण्यात आली. कपूर यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली असून, आज सकाळी ११ वाजता कपूर यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.