आपल्याला कुटुंब कलहाला सामोरे जावे लागते कारण, वास्तूशास्त्राबद्दल ‘या’ महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात…

0
258

आज आपण वास्तुशास्त्र बद्दल जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्र आपल्या साठी खूप महत्त्वाचे आहे. प्राचीन वास्तूशास्त्र आणि आत्ताचे वास्तुशास्त्र याच्यामध्ये किती फरक आहे. घराचे बांधकाम पंचतत्वाचा नियमानुसार करणे का गरजेचे आहे. नवीन घर बांधण्याच्या आधी आपल्याला कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत. आणि त्याचा काय फायदा होतो. या सर्व गोष्टींची उत्तरे आज येथे तुम्हाला मिळतील.

प्राचीन वास्तुशास्त्र आणि आताचे वास्तुशास्त्र या दोघांचा विचार केला तर यामध्ये आपणाला खूप मोठी तफावत दिसून येते.जुन्या काळी कोणत्याही इमारतीचे बांधकाम करतेवेळी वास्तुशास्त्राचे सखोल अभ्यास असणाऱ्या माणसाकडून सर्व गोष्टी समजून घेतल्या जायच्या. आता जसजसा वेळ निघत गेला तसतसे लोक वास्तुशास्त्राचे महत्त्व विसरू लागले. आजच्या काळामध्ये वास्तुशास्त्राचा अभ्यास ज्योतिषशास्त्र सोबत करायला सुरुवात केली आहे.

प्रत्येकाचे स्वप्न असते कि आपले सुंदर असे घर असावे पण आजच्या काळामध्ये घर बांधताना अनेक गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. आपण जर बांधायची योजना बनवत असतो त्याचे प्लॅन तयार करत असतो. पण हे सगळं करत असताना आपण वास्तुशास्त्राचे किंवा पंचतत्वाचे नियम विसरून जातो. या कारणामुळे आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आजकाल आपण पाहतो की खूप सारे वास्तुशास्त्री आहेत जे घराचे प्लॅन तयार करून देतात. आजच्या काळामध्ये वास्तुशास्त्राचा अभ्यास ज्योतिषशास्त्राचे लोक करत आहेत. एकोणिसाव्या शतकामध्ये लोकांनी वास्तुशास्त्राला ज्योतिषशास्त्र सोबत जोडायला कशी काय सुरुवात केली कारण ज्योतिष शास्त्र आणि वास्तूशास्त्र हे विज्ञानाच्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

आपल्या सर्वांना माहीत आहे या गोष्टी कशासाठी केल्या जातात. लोकांना अंधश्रद्धा करायला लावून पैसे लुटण्यासाठी या सर्व गोष्टी करण्यात येतात.
ज्योतिषशास्त्र शिकलेल्या माणसांनी वास्तुशास्त्राला वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असं केलं तर तुमच्यावर राहूचा प्रभाव राहील , हे केलं तर सुख शांती भेटेल, तुमच्या घरांमध्ये शनीचा प्रकोप आहे ,तुमच्या घरांमध्ये याचा दोष आहे त्याचा दोष आहे ,अशा नको त्या गोष्टी सांगायला सुरुवात केली आहे . असे दिसून येते की यामुळे वास्तूशास्त्र कमी व अंधश्रद्धा जास्त प्रमाणात पसरत आहे.

ज्योतिष शास्त्र चा अर्थ होतो ज्योती पिंड यांचा अभ्यास. काही वर्षापूर्वी रेखागणित, बीजगणित, खगोलशास्त्र या सर्व ज्योतिष शास्त्रचा भाग होत्या परंतु आता यांना ज्योतिषशास्त्र पासून वेगळे करण्यात आले आहे .ज्योतिष शास्त्र मध्ये ग्रह, उपग्रह ,नक्षत्र ,सूर्यग्रहण ,चंद्रग्रहण, दक्षिणायन व उत्तरायण ऋतू या गोष्टींचा अभ्यास केला जायचा.

वास्तुशास्त्र मध्ये घराच्या निर्मिती बद्दल माहिती सांगण्यात आली आहे. वास्तूचा अर्थ होतो इमारत आणि शास्त्राचा अर्थ होतो पद्धत . प्राचीन काळी घर बांधायचे आधी खूप गोष्टींचा अभ्यास केला जायचा .जसे की बांधकामाच्या ठिकाणी असलेली माती बांधकामास योग्य आहे की नाही, तेथे असणारे खडक बांधकामाचा बोजा घेऊ शकते की नाही व त्याचबरोबर घराच्या आजूबाजूला शांत वातावरण आहे की नाही. घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडांचा अभ्यास केला जायचा भविष्यात झाडांची मुळे बांधकामाला काही नुकसान करू शकतात का याचाही विचार केला जायचा.

ज्या ठिकाणी घर बांधत आहोत त्या ठिकाणाची पाण्याची उपलब्धता हवेची दिशा याही गोष्टी पाहिल्या जायच्या. या सर्व गोष्टीकडे घर बांधायच्या आधी मुख्य गोष्टी म्हणून त्यांचा विचार केला जायचा आणि मगच बांधकाम सुरू केलं जायचं. जुन्या काळामध्ये घराच बांधकाम करताना पंचत्वाला जास्तीतजास्त महत्त्व दिले जायचे.

या सगळ्याच आपल्या घरातील स्थान एका निश्चित ठिकाणीच असते.जल हे तत्व ईशान्य दिशेला निश्चित असते.अग्नीचे स्थान आग्नेय दिशेस आणि तिसरे तत्व पृथ्वी हे नैऋत्य दिशेस असते.आकाश तत्व हे घराच्या मध्यभागी तर वायू तत्त्व हे वायव्येस असायला हवे.जेव्हाही आपण घर बांधणार असो तेंव्हा या गोष्टीचा अभ्यास करायलाच हवा.

ज्याप्रमाणे आपले शरीर पाच तत्वाने मिळुन बनले आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात पंचतत्वाचे एक निश्चित स्थान असायला हवे.पंचतत्वानुसार निर्माण केलेल्या घरात राहिल्यावर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते.घराचं वातावरण आपल्या शरीराच्या वातावरणासोबत मिळुन आपल्याला नवचैतन्य देते.या पंचतत्वाचा अर्थ आहे तरी काय.पृथ्वी, पाणी,अग्नि, वायु आणि आकाश या पाच तत्वांचे मिळून बनले आहे त्याचप्रमाणे आपले घरसुध्दा याच तत्वावर असायला हवे.

या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून वस्तू बांधली गेली कि, सकारात्मक ऊर्जा हि उत्पन्न होत राहते जी आपल्या आपल्या आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिकते साठी महत्वपूर्ण ठरते.