जमीन मालकाला १०० कोटींची लॉटरी

0
1067

– स्लम टीडीआरची किमत सुमारे २५० कोटी रुपये
– पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५०८ कोटींचा खर्च, झोपडीधारकांना मिळणार ३०० चौरस फुटांची सदनिका

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन केले जाणार असून या कामी ५०७ कोटी ९० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. झोपडीधारकांना प्रत्येकी ३०० चौरस पुâटांच्या सदनिका दिल्या जाणार असून अकरा मजली उंच गगनचुंबी इमारतीत त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. खासगी आणि महापालिका मालकीच्या जागेवर गांधीनगर वसले आहे. ६२ हजार ७१४ चौरस मीटर क्षेत्रफळावर वसलेल्या या झोपडपट्टीच्या जागेवर खेळाचे मैदान, दवाखाना, माध्यमिक शाळा, किरकोळ बाजार, उद्यान, डिपी रस्ता आदींचे आरक्षण आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला जाणार असल्याने भूखंड ताब्यात घेण्याकामी जागा मालकास १०० कोटी रुपये मोबदला द्यावा लागणार आहे. याखेरिज, २६ लाख १५ हजार ७५० चौरस फुटाचा ’स्लम टीडीआर’ तयार होणार असून त्याची किंमत आजच्या बाजारभावने सुमारे २५० कोटी रुपये पर्यंत होते आहे.

गांधीनगर झापडपट्टीतील एकूण २ हजार ३२ झोपडीधारकांना पुनर्वसनाचा लाभ मिळणार आहे. झोपडीधारकांना ३०० चौरस पुटाâटांच्या सदनिका मोफत देण्याबरोबरच साडेचारशे ते ६०० चौरस फुटांच्या ४७६ सदनिका आणि ३४४ वाणिज्य गाळयांची खुल्या बाजारात विक्री केली जाणार आहे. आगामी पाच वर्षात हा गृहप्रकल्प उभारण्याचे बंधनकारक आहे. पिंपरी – भोसरी मार्गालगत गांधीनगर झोपडपट्टी वसली आहे. ही अगदी मोक्याची जागा आहे. गांधीनगर झोपडपट्टीलगत आता गगनचुंबी ’महिंद्रा हौसिंग सोसायटी’ झाली आहे. थ्री स्टार, फोर स्टार हॉटेल्स आजूबाजूला आहेत. महापालिका भवनाबरोबरच पिंपरी वाहतूक पोलिस कार्यालय, धार्मिक स्थळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई पुâले यांची स्मारके याच परिसरात आहेत. पीएमपीएमएल बसस्थानकही नजिक आहे. पिंपरी रेल्वे स्थानक आणि भविष्यात मेट्रो स्थानक हाकेच्या अंतरावर आहे.

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी सुरू झाल्यानंतर शहरात औद्योगीकरण वाढू लागले. रोजगारासाठी राज्य – परराज्यातून लोक येऊ लागले. मिळेल तिथे झोपडी उभारून राहू लागले. अशा प्रकारे खासगी आणि महापालिका भूखंडावर गांधीनगर वसल्याचे सांगितले जाते. मात्र, खऱ्या अर्थाने त्याचा विस्तार झाला, झोपड्यांची संख्या वाढली ती १९७२ च्या दुष्काळात. मराठवाड्यातील सर्वाधिक मजूर वर्ग येथे आला आणि स्थायिक झाला. गेल्या पन्नास वर्षांत दोन पिढ्या झाल्या. तिसऱ्या पिढीचे वास्तव्य याठिकाणी आहे.२००२ मध्ये ’मशाल’ संस्थेमार्पर्यंत या झोपडपट्टीचे सव्र्हेक्षण करण्यात आले. त्यावेळी १ हजार ४५० झोपड्या असल्याचे आकडेवारी सांगते. आज ६२ हजार ७१४ चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर गांधीनगर वसले आहे. गुगल मॅप आणि भूखंड व्याप्तीनुसार याठिकाणी २ हजार ३२ झोपड्या असल्याची वस्तुस्थिती आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेने या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी २७ मे २० रोजी मेसर्स एम.एम. प्रोजेक्ट कन्सलटंट प्रायव्हेट लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सल्लागाराने मंगळवारी (दि.१५) ’ड्राफ्ट कन्सेप्ट रिपोर्ट’ आणि संकल्पन आराखडा महापालिका पदाधिकारी – अधिकाऱ्यांना सादर केला. महापौर उषा ढोरे यांच्या अध्यखतेखाली झालेल्या बैठकीला सभागृहनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, कैलास बारणे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी आदी उपस्थित होते. हा गृहप्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) नियमावलीनुसार राबविला जाणार आहे.

अकरा मजल्याच्या ५ इमारतीत १ हजार ८२९ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यांना प्रत्येकी ३०० चौरस फुटाच्या सदनिका दिल्या जातील. त्यासाठी प्रति चौरस पुâट ३ हजार ३६० रुपये बांधकाम दर गृहित धरण्यात आला आहे. पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीची उंची ४० मीटर तर विक्रीयोग्य सदनिकांच्या इमारतींची उंची ७० मीटर निश्चित करण्यात आली आहे. २० मजली गगनचुंबी इमारतीतील ४७६ सदनिका आणि ३४४ वाणिज्य गाळे विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी ३ चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरला जाणार आहे. प्रकल्पासाठी ३८३ कोटी ६१ लाख रुपये खर्च अंदाजित धरण्यात आला आहे. झोपडीधारकांचे पुनर्वसन करताना लाभाथ्र्यांना ट्रान्झिट कँम्प आणि त्यासाठीच्या सर्व सुचिधा मोफत पुरविल्या जाणार आहेत. ट्रान्झिटसाठी स्थलांतरीत केल्या जाणाऱ्या झोपडीधारकांना बिल्डरमार्पâत निवारा, घरभाडे, वीज, पाणी विंâवा रोख रकमेची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. वर्क ऑर्डर दिल्यानंतर ५ वर्षात गृहप्रकल्प पुर्णत्वास नेण्याचे बंधन बिल्डरवर आहे.