आपण घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत बिल गेट्सकडून मोदींच कौतुक

0
370

 

दिल्ली, दि.२३ (पीसीबी) – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. पाश्चिमात्य देश कोरोना पुढे हतबल दिसून येत आहे. तर दुसरीकडे कोरोना विरोधात सुरु असलेल्या लढाईत भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे प्रयत्न केले आहेत त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ‘कोरोना’सोबतच्या लढ्यात केलेल्या उपाययोजनांचे बिल गेट्स यांनी कौतुक केले आहे.

या पत्रात बिल गेट्स म्हणतात, ‘तुमच्या सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेणे, क्वारंटाईन करणे, हॉटस्पॉट ओळखण्यासाठी चाचण्या वाढवणे, आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे, असे घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत, असे गेट्स यांनी लिहिलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी वेळीच उपाययोजना आखत कठोर निर्णय घेतल्यामुळे भारतातील कोरोनाच्या संसर्ग दरात घट दिसत आहे. तुमचे नेतृत्व, तुमच्या सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचे कौतुक करतो.’ असे बिल गेट्स यांनी म्हंटले आहे.