आता पैसे मिळत नसल्याची तक्रार का करता ?, आधी घड्याळाचे बटण दाबा – अजित पवार

0
1406

अहमदनगर, दि. २ (पीसीबी) – आधी घड्याळाचे बटण दाबा. घड्याळाचे बटण दाबायचे नाही आणि आम्हाला पैसे का मिळाले नाही म्हणून आम्हाला विचारता. अहो त्या कमळाबाईला विचारा ना, असे उत्तर पैसे मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पाथर्डी येथे दिले.    

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेनिमित्त पाथर्डी येथील जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी   एका शेतकऱ्याने पैसे मिळत नसल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली. यावर अजित पवारांनी त्यांना  उत्तर दिले.

यावेळी बोलताना अजित पवारांनी भाजप-शिवसेना सरकारवर हल्ला चढवला. या सरकारची थापेबाजी सुरु आहे. चुकीचे आदेश काढत आहेत हे वेळीच ओळखा. कसल्या लाल पिवळ्या याद्या काढता. हा सिग्नल आहे का लाल, पिवळा, हिरवा दिसला की थांबा आणि जावा हे काय चालले आहे,  असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.