..आता अशोक गेहलोत काय करणार

0
198

जयपूर, दि. २७ (पीसीबी) – राजस्थानातील सत्तासंघर्ष थांबण्याचं अद्याप नाव घेत नाहीये. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव मांडला होता पण राजस्थानच्या राज्यपालांनी तो नाकारला आहे.

राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका परत घेतली आहे. काँग्रेसच्या विरोधात मतदान करावे, असा व्हीप बहुजन समाज पक्षाने जारी केला आहे. याआधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आरोप केला होता की, भाजप त्यांचं सरकार पाडायचा प्रयत्न करत आहे. एकीकडे आम्ही कोरोनाशी लढत आहोत, तर दुसरीकडे भाजप आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्यांनी म्हटलं. तसंच त्यांनी भाजपवर आमदारांचा घोडेबाजार केल्याचा आरोपही केला होता. या कथित आरोपाची स्पेशल ऑपरेशन ग्रूप चौकशी करत आहे. पोलिसांच्या एसओजीने मुख्यमंत्री अशोक गहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि सरकारचे मुख्य समन्वयक महेश जोशी यांनीही चौकशीसाठी बोलावलं होतं.

राजस्थानच्या काँग्रेस सरकारमध्ये अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट असा सामना सुरू झाला आहे. जसं की मध्यप्रदेशात कमलनाथ विरुद्ध ज्योतिरादित्य शिंदे झालं होतं आणि तिथं काँग्रेस सत्तेच्या बाहेर फेकली गेली.

पीटीआय च्या मते, सचिन पायलट सोमवारच्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सहभागी होणार नाही. त्यांनी म्हटलं आहे की, माझ्यासोबत काँग्रेसचे 30 आमदार आहेत आणि अशोक गहलोत यांचं सरकार अल्पमतात आहे. सचिन पायलट आता दिल्लीत आहेत आणि राजस्थानात मात्र काँग्रेसच्या आमदरांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषद होऊ शकते. अशोक गहलोत यांच्याकडे 109 आमदारांचा पाठिंबा आहे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे