आक्षेपार्ह घोषणा दिल्याप्रकरणी कन्हैयाकुमारविरोधात आरोपपत्र दाखल होणार

0
580

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) –  जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ९फेब्रुवारी २०१६ रोजी आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याप्रकरणी  दिल्ली पोलीस पतियाळा हाऊस  न्यायालयात आज (सोमवार) आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे.  या आरोपपत्रात जेएनयूतील विद्यार्थी नेते कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य आणि उमर खालिद यांच्यासह ७ काश्मीरी नागरिकांचा समावेश आहे.

संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ९ फेब्रुवारी २०१६ रोजी केले होते.  या कार्यक्रमात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्यांवर  केला होता.  कन्हैया कुमार,ओमार खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य या विद्यार्थीनेत्यांविरोधात राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणाचा तीन वर्षांनंतर तपास पूर्ण करण्यात आला असून आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे,  असे  दिल्ली पोलिसांनी  सांगितले. या आरोपपत्रात आकीब हुसेन, मुजीब हुसेन, मुनीब हुसेन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खलिद बशीर भट या काश्मीरी नागरिकांचाही समावेश  आहे.