आईला कोरोना झाल्याचे समजताच मुलाची आत्महत्या

0
224

नाशिक, दि. १८ (पीसीबी) : कोरोनामुळे समाजातील माणसिक स्वास्थ बिघडत चालले आहे. आईला कोरोना झाल्याचं समजल्यानंतर 23 वर्षीय मुलाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. नाशिकच्या रोकडोबा वाडीत हा दुर्दैवी प्रकार घडला. संबंधित महिलेवर मागील काही दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. उपनगर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून समाज कल्याण कार्यालयातील सेंटरमध्ये उपचार सुरु होते. 23 वर्षीय मुलाला आपल्या आईला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं. यानंतर त्याने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना तात्काळ पाचारण केले. उपनगर पोलीस सध्या सर्व गोष्टींचा तपास करत आहेत.