अंतिम वर्षांची परिक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णया विरोधात आदित्य ठाकरे सर्वोच्च न्यायालयात

0
208

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – कोरोनाचं संकट असतानाही अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) निर्णयाविरोधात युवासेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. युवासेनेने यूजीसीच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमी त्या त्या राज्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येक राज्यातील विद्यापीठांना संबंधित अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात यावा, जेणेकरुन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. तसंच देशात सर्व विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांसाठी आम्ही खंबीरपणे उभी राहणार असल्याचं युवानेनेने म्हटलं आहे. युवासेनेने याआधी या निर्णयाचा विरोध केला होता.

दरम्यान, अंतिम वर्षांच्या परिक्षांबद्दल महाराष्ट्रा प्रमाणे दिल्लीसह अन्य काही राज्यांनीही नाराजी दर्शविली आहे. त्यामुळे या विषयाला आता केंद्र विरुध्द राज्य असा राजकीय रंग आला आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्यामुळे विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्यास बहुतेकांचा विरोधा आहे, मात्र भाजपने त्याबाबत विरोधात भूमिक घेतली आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकराने परिक्षा नको म्हणून वारंवार विनंती केली, परंतु परिक्षा होणार अशी यूजीसी चू भूमिका राहिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची कुचंबना सुरू आहे.