अहमदनगर जिल्ह्यातील ३५ गावांच्या पाणी प्रश्नासाठी अभिनेत्री दीपाली सय्यदचे आमरण उपोषण

0
580

अहमदनगर, दि. १० (पीसीबी) – अहमदनगर जिल्ह्यातील ३५  गावांच्या पाणी प्रश्नासाठी अभिनेत्री  दीपाली सय्यदने ९ ऑगस्टपासून जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आमरण उपोषणाला  सुरुवात केली आहे. दीपाली सय्यदच्या आमरण उपोषणाचा आज (शनिवार)  दुसरा दिवस आहे. जो पर्यंत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळत नाही, तो पर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार आहे, असे दीपाली सय्यदने म्हटले आहे.  

अभिनेत्री मानसी नाईक, सीमा कदम, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर यांनी या उपोषणाला  पाठिंबा दिला आहे.  दीपाली गेल्या दीड महिन्यापासून योजनेसाठीचा लढा उभारत आहे. यासाठी तिने लाभधारक गावातून आंदोलनासाठी मोठा पाठिंबा मिळवला आहे.  परंतु सरकारकडून कोणतीही अद्याप दखल घेतलेली नाही.

जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी दीपाली सय्यदचे आमरण उपोषण सुरु आहे.  अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न साकळाई योजनेतून सुटणार आहे. गेल्या २० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते.