बी-टीम स्पष्टीकरणावर आंबेडकर अडून पडल्याने काँग्रेस नेते पडले तोंडघसी

0
471

मुंबई, दि. १० (पीसीबी) – वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभेला मोठा फटका बसल्याने विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने सोबत यावे यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. मात्र ‘बी टीम’च्या स्पष्टीकरणावर आंबेडकर अडून राहिल्याने काँग्रेसचे नेते तोंडघसी पडले.

काँग्रेस नेत्यांनी आंबेडकर यांची त्यांच्या दादरमधील निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चर्चा झाली. वंचितने महाआघाडीत यावे, अशी विनंती आंबेडकर यांना करण्यात आली. मात्र  आंबेडकर यांनी काँग्रेसने वंचितवर केलेल्या ‘बी टीम’च्या आरोपांचं स्पष्टीकरण मागितल्याने काँग्रेसच्या नेत्यांची बोलती बंद झाली.