‘असं’ केलं तर तुम्हाला मिळू शकते नव्या कारच्या खरेदीवर ५ टक्के सूट – नितीन गडकरी

0
239

नवी दिल्ली,दि.०८(पीसीबी) – केंद्र सरकारने जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी आखलेल्या व्हेईकल स्क्रॅप्रिंग धोरणामुळे ग्राहकांना एक मोठा फायदा होणार आहे. या धोरणानुसार तुम्ही तुमची जुनी गाडी भंगारात देऊन नवी गाडी खरेदी केली तर तुम्हाला नव्या कारच्या खरेदीवर ५ टक्के सूट मिळेल. केंद्रीय भूपृष्ठ आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

नितीन गडकरी यांच्या या घोषणेनुसार ग्राहकाने जुनी कार स्क्रॅप केल्यास वाहन कंपनीकडून संबंधित ग्राहकाला कार खरेदीवेळी पाच टक्क्यांची सूट मिळेल. त्यामुळे जुन्या गाड्या असलेल्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

मोदी सरकारकडून यंदाच्या अर्थसंकल्पावेळी स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार 20 वर्षांपेक्षा जुन्या खासगी वाहनांसाठी फिटनेस टेस्ट करावी लागणार आहे. तर व्यावसायिक वाहनांसाठी ही कालमर्यादा 15 वर्षे इतकी आहे. मात्र, या धोरणाची अंमलबजावणी सध्या ऐच्छिक आहे.