अशा माणसांना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यायला हवी – अमृता फडणवीस

0
389
मुंबई, दि.७ (पीसीबी) – महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमृता यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. “स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी समाजातून होत असते. अगदी त्यांना फासावर लटकवा किंवा स्त्रीया अशा नराधमांना आमच्या हातात द्या आम्ही त्यांना शिक्षा देतो अशीही मागणी करताना दिसतात. अशापद्धतीने कायदा हातात घेणे किती योग्य आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटते,” असा प्रश्न विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला.
स्त्रियांची अत्याचार सहन करण्याची सहनशक्ती संपल्याचे मत अमृता यांनी मांडले. “स्त्रिया वर्षानुवर्ष खूप सहन करत आलेल्या आहेत. आता अन्याय सहन करण्याची स्त्रियांची सहनशक्ती संपलेली आहे. त्यामुळे आता स्त्रियांना कायदा हातात घ्यायची इच्छा होतेय,” असे अमृता म्हणाल्या. दिल्लीतील निर्भया प्रकरणामधील आरोपी स्वत:ला वाचवण्याचे किती प्रयत्न करतोय हे आपण पाहतोच आहे. मात्र अशा माणसांना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यायला हवी असे मलाही मनापासून वाटते. असे केले तर अशा पद्धतीने शिका होईल अशी भिती निर्माण झाली पाहिजे लोकांमध्ये. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या मुल्यांचे जतन करावे याबद्दल लोकं विचार करण्यास सुरुवात करतील,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.