अल्ला हू अकबरचे नारे देत चाकू हल्ला

0
195

पॅरिस, दि. ४ (पीसीबी) : फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये आयफेल टॉवर आहे. या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देत असतात. याच ठिकाणी तीन पर्यटकांवर एका तरुणाने अल्ला हू अकबरचे नारे देत चाकू हल्ला केला. या घटनेत एका जर्मन तरुणाचा मृत्यू झाला. इतर दोन पर्यटक गंभीर रित्या जखमी झाले आहेत. फ्रान्सचे गृहमंत्री गेरॉल्ड डर्मेनिन यांनी हल्लेखोराला पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी हल्लेखोराची चौकशी सुरु केली आहे. त्यामध्ये हल्लेखोराने सांगितलं की अफगाणिस्तान आणि पॅलेस्टाईन या ठिकाणी मुस्लीम धर्माचे लोक मारले जात आहेत त्यामुळे आपण अस्वस्थ झालो आणि हा हल्ला केला. स्थानिक एजन्सीजने याबाबत काहीही स्पष्ट केलेलं नाही. गृहमंत्र्यांनी इतकंच म्हटलं आहे की या प्रकरणी हल्लेखोराची चौकशी सुरु आहे त्यातून लवकरच योग्य ती माहिती मिळेल. इंडिया टुडेने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

गृहमंत्री गेरॉल्ड डर्मेनिन यांनी म्हटलं आहे की पॅरिसमध्ये शनिवारी रात्री ९ च्या सुमारास एका हल्लेखोराने एका विदेशी पर्यटक जोडीवर हल्ला केला. त्यानंतर आणखी एकावर हल्ला केला. फिलिपीन्समधल्या एका जर्मन पर्यटकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्याच्यावर हल्लेखोराने चाकू हल्ला केला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले आणि या हल्लेखोराचा पाठलाग करुन त्याला अटक केली.

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार हा हल्लेखोर इस्लामचं पालन करणारा आहे. तसंच तो मानसिक दृष्ट्या कमकुवत असल्याचंही कळतं आहे. या घटनेची चौकशी आणि हल्लेखोराची चौकशी सुरु आहे हे स्पष्ट करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये अशा प्रकारचे हल्ले वाढता आङेत गेल्या महिन्यातच एका हल्लेखोराने अल्ला हू अकबरचा नारा देऊन गोळीबार केला होता.