अल्फ इंजिनिअरिंग कंपनीच्या कामगारांना १० हजारांची पगारवाढ

0
405

– स्वाभीमानी श्रमिक कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनात करार
– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची यशस्वी मध्यस्थी

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे येथील अल्फ इंजिनिअरिंग प्रा. लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या वेतनवाढ करारामुळे कामगारांना १० हजार रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत यशस्वी मध्यस्थी केली.

बैठकीला आमदार महेश लांडगे, कामगार नेते रोहिदास गाड़े, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, संघटक रघुनाथ मोरे, तेजश बीरदवडे, प्रशांतआप्पा पाडेकर, यूनिट अध्यक्ष किशोर गोरखा, उपाध्यक्ष योगेश गाढवे, सरचिटणीस महेंद्र लाड, चिटणीस सुदाम गुळवे खाजिनदार राजेश सिंह, संघटक योगेश व्येवहारे, गणेश पवार आदी उपस्थित होते.

कंपनी व्यस्थापनाच्या वतीने प्लन्ट हेड विनोद टिपरे, एच. आर. हेड. गंगाधर लहाने यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे.
स्वाभीमानी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन यळवंडे म्हणाले की, अल्प इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीचा करार संपुष्टात येवून २२ महिने झाले होते. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सूर होता. कोरोना आणि लॉकडाउनचे कारण पुढे करीत कंपनी करार लाबण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे विसंवाद निर्माण झाला होता. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी हस्तक्षेप करुन कंपनी व्यवस्थापनामध्ये यशस्वी मध्यस्थी केली आणि २२ महिन्यांपासून रखडलेला करार अखेर पूर्ण करण्यात आला. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कंपनी आणि कामगारांमध्ये झालेल्या करारानुसार दहा हजार रुपये पगार वाढ, कराराचा कालावधी तीन वर्षे, ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, कर्तव्यावर असताना एखाद्या कामगाराचा मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार आणि कंपनीकडून २ लाख रुपये कायदेशीर वारसास मिळणार, ५लाख रुपयांची ग्रुप अक्सिडेंट पॉलिसी, ६० हजार रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज, पगाराची उचल म्हणून कामगारास त्याच्या पगाराच्या ५टक्के रक्कत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, दिवाळी बोनस:- मार्च महिन्याचा एक ग्रॉस पगार वार्षिक बोनस म्हणून देण्यात येणार आहे. बस – येलवाडी पासून देहूमार्गे नवीन बस सुविधा, प्रत्येक कामगाराला प्रत्येकी २३ महिन्याचा फरक देण्यात येईल, आदी प्रमुख बाबींचा समावेश आहे. करारानंतर कामगारांनी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करीत आनंद व्यक्त केला.